-
मुंबई, ठाणे परिसरात पावसाने अक्षरश: धिंगाणा घातला असला तरी बच्चे कंपनीने मात्र या मुसळधार पावसाचा मनमुराद आनंद घेतला. पावसात नाचत-बागडत, चिंब भिजत चिमुरडय़ांनी पावसोत्सव साजरा केला. (छाया : गणेश जाधव)
-
नवी मुंबईतील खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना येथील सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने तेथून बाहेर पडण्यासाठी तारेवरची कसरत करण्याची वेळ आली होती. (छाया – नरेंद्र वास्कर)
-
मुस्लिम बांधवांच्यादृष्टीने पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला असून बुधवारी दिल्लीतील जामा मशिदीत रोज्याचा उपवास सोडताना ही लहान मुले. (छाया- पीटीआय)
-
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना मिठी नदीवरून जाणाऱ्या विमानांचे टिपलेले छायाचित्र. (छाया- पीटीआय)
-
रविवारच्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लखनऊमधील महिलावर्ग योगासनांचा सराव करताना. (छाया- पीटीआय)
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा