-
पावसाळ्यात समुद्राच्या लाटा अंगावर झेलत भिजण्याचा आनंद काही औरच असतो. मुंबईतील मरिनड्राईव्हचा समुद्रकिनारा पाऊस आणि समुद्र असा दुहेरी आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या हौशी लोकांसाठी हक्काचे स्थान आहे. (छाया- एपी)
-
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बंद पडलेल्या टॅक्सीला धक्का मारताना मुंबईतील नागरिक.
-
मुंबईतील मरिनड्राईव्ह समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आनंद लुटताना काही तरूणी. (छाया- एपी)
-
मुंबईतील मरिनड्राईव्ह समुद्रकिनाऱ्यावर छत्रीत बसून पावसाचा आनंद लुटताना हे प्रेमीयुगुल. (छाया- एपी)
-
मुंबईतील मरिनड्राईव्ह समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आनंद लुटण्यासाठी उभ्या असलेल्या कुटुंबाची मोठी लाट आल्यानंतर अशाप्रकारे त्रेधातिरपीट उडाली. (छाया- एपी)
-
आपला लहान भाऊ पावसात भिजू नये म्हणून कोलकात्त्यामधील हा लहान मुलगा भावाच्या डोक्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून धावताना. (छाया- पीटीआय)
-
मुंबईमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात खेळताना ही लहान मुले.
-
-
पाऊस असो वा काहीही असो मुंबईकरांची ऐटच काही वेगळी असते. आजुबाजूला पाणी साचले असताना बसस्टॉपवर निवांत झोपलेला हा तरूण याचेच दर्शन घडवत आहे. (छाया- एपी)
-
सुरतमधील सहारा दरवाजा येथे मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या चबुतऱ्याचा भाग तुटला होता. (छाया- पीटीआय)
-
शिमला येथे मुसधार पाऊस पडत असतानाचे दृश्य. ( छाया- एक्सप्रेस)
-
-
मुंबईत पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना ट्रॅकवर उतरावे लागले. ( छाया- एक्सप्रेस)
-
मुंबईत पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना ट्रॅकवर उतरावे लागले. ( छाया- एक्सप्रेस)
-
-
मुंबईत पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना ट्रॅकवर उतरावे लागले. ( छाया- एक्सप्रेस)
-
गुजरातमधील राजकोटमध्ये पुरामुळे घरांचे मोठ्याप्रमाणवर नुकसान झाले आहे. (छाया- पीटीआय)
-
मुसळधार पावसात कोलकात्त्यामधील पोलीस परिसराची पाहणी करताना. (छाया- पीटीआय)
-
गुजरातमधील गोंडल येथील लोकांना पुराच्या पाण्यातून अशाप्रकारे वाट काढावी लागत होती. (छाया- पीटीआय)
-
गुजरामधील सौराष्ट्रमध्ये मुसळधार पावासमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात ही बस अशाप्रकारे अडकून पडली होती. (छाया- पीटीआय)
-
संततधार पाऊस पडत असताना दिल्ली शहरात टिपलेले छायाचित्र. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
मुसधार पावसामुळे हैदराबादमधील या बाईकस्वाराला समोरचा रस्ता दिसेनासा झाल्यामुळे चांगलीच कसरत करावी लागली. (छाया- एपी)
-
आकाशात काळे ढग दाटून आले असताना टिपलेले मरिनड्राईव्ह समुद्रकिनाऱ्याचे छायाचित्र. (छाया- एपी)
-
डोक्यावर मुसळधार पाऊस पडत असताना ट्रकचे टायर्स टॅक्सीमध्ये ठेवण्यासाठी निघालेला हा माणूस. (छाया- एपी)

Daily Horoscope: अपयशाने जाऊ नका खचून, फसवणुकीपासून रहा सावध; आज कोणता सल्ला तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर? वाचा १२ राशींचे राशिभविष्य