-
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे या विभागांसह पश्चिम उपनगराच्या १४० किलोमीटरच्या परिसरात सध्याच्या घडीला ३५ बिबट्यांचा वावर आहे. ( छाया- निकेत सुर्वे)
-
मुंबईजवळच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील बिबळ्यांनाही जणू या महानगरीची बाधा झाली आहे. महानगरीप्रमाणे येथील बिबळ्यांची संख्या २१वरून ३५वर गेली आहे. ( छाया- निकेत सुर्वे)
-
परंतु या १०४ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या उद्यानात बिबळ्यांना आवडणारे चितळ, सांबर आदी खाद्य मुबलक प्रमाणात असूनही त्यांना बाहेरच्या ‘इन्स्टंट’ खाण्याची चटक लागली आहे. ( छाया- निकेत सुर्वे)
-
त्यामुळे उद्यानात व आजूबाजूच्या मानवी वस्तीत सहजासहजी पकडता येतील अशी कुत्री, मांजरी, शेळ्या ही बिबळ्यांच्या आहाराचा प्रमुख भाग बनू लागली आहेत. ( छाया- निकेत सुर्वे)
-
‘भारतीय वन्यजीव संस्थे’चे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी निकित सुर्वे यांनी उद्यानातील ६० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सहा महिने पाहणी करून एक अहवाल तयार केला आहे. ( छाया- निकेत सुर्वे)
-
बिबळ्यांची संख्या मोजण्याबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास या पाहणीत करण्यात आला आहे. यात बिबळ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला हा महत्त्वपूर्ण बदल नोंदविण्यात आला आहे. ( छाया- निकेत सुर्वे)
-
या पाहणीकरिता उद्यान आणि आरे कॉलनी परिसरातील तब्बल १४० चौरस किलोमीटर परिसरात एकूण ४५ कॅमेरे बसविण्यात आले होते. बिबळ्यांचे केलेले चित्रीकरण, त्यांची विष्ठा, ठसे आदींचा एकत्रितपणे शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यात आला. यात बिबळ्यांची संख्या ३५ वर पोहोचल्याचे आढळून आले आहे. ( छाया- निकेत सुर्वे)
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा