-
रशियामध्ये सुरू असलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत चेक रिपब्लिकचा जलतरणपटू २७ मीटर उंच डाईव्ह प्रकारात सादरीकरण करत असताना टीपलेले छायाचित्र. (पीटीआय)
-
मुंबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस उपस्थित होती. (पीटीआय)
-
मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा व कंपनीच्या विपणन व विक्री विभागाचे कार्यकारी संचालक रणधीर सिंग यांनी बुधवारी नवी दिल्लीत कंपनीचे एसयूव्ही श्रेणीतील पहिले वाहन ‘एस-क्रॉस’ सादर केले. कंपनीच्या ‘नेक्सा’ या अभिजनांसाठी विशेषरचित दालनातून एस-क्रॉसची विक्री होईल. या गटातील ह्य़ुंदाई, रेनॉच्या स्पर्धेत उतरलेल्या एस-क्रॉसची किंमत ८.३४ ते १३.७४ लाख रुपये दरम्यान आहे.(पीटीआय)
-
दीपक निवास हुडाच्या अष्टपैलू कामगिरीने बुधवारी कबड्डीरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दमदार चढाया आणि अचूक पकडी करीत एकीकडे हुडाने बंगाल वॉरियर्सवर दडपण आणले, तर दुसरीकडे राहुल चौधरीने चौफेर चढाया करीत गुणांचा सपाटा लावला. त्यामुळे प्रो कबड्डी लीगमध्ये तेलुगू टायटन्सने बंगालचा ४४-२८ असा पराभव करून गुणतालिकेतील दुसरे स्थान राखले आहे.
-
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना गुरुवारी घेता येणार आहे. मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतरचे (डावीकडील) आणि तत्पूर्वीचे रूप असे आहे. त्यातील सुबकता सहजपणे लक्षात येऊ शकते.
पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्