-
‘उडता पंजाब’ या चित्रपटामुळे पंजाबमधील तरूण-तरुणींना लागलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
-
पंजाबला अमली पदार्थांचा विळखा पडत असल्याचे दिसू लागल्यावर राज्य सरकारने लगेचच कारवाई सुरू केली. पण त्याचा परिणाम व्यसनमुक्तीमध्ये होण्याऐवजी केवळ कायद्याचा बडगा उगारण्यावरच सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले.
-
अमली पदार्थ जवळ बाळगल्याने आज पंजाबमधील अनेक तरूण-तरुणी तुरुंगात आहेत. पण प्रश्नाचे उत्तर अजून सापडलेले नाही.
-
पंजाबमध्ये २०१४ साली १७,०६८ नागरिकांना तर २०१५ मध्ये ११,५९३ नागरिकांना कैद करण्यात आले.
-
एवढं सगळ करूनही पंजाबला पडलेला अमली पदार्थांचा विळखा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू केली आहे की व्यसनाधीन व्यक्तींच्या विरोधात असा प्रश्न पडला आहे.
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ