-
२३ वर्षाची ही मॉडेल तिच्या छायाचित्रांसाठी प्रसिध्द आहे. तिची ही छायाचित्रे साधीसुधी नसून अतिशय उंच ठिकाणी काढण्यात आली आहेत. थरार अनुभवण्याची आवड असलेल्या एंजेलिना निकोलाऊने चीन आणि हाँगकाँगमध्ये अनेक आठवडे वास्तव्य करून येथील सर्वात उंच इमारती आणि ठिकाणांवर जाऊन फोटोशूट केले. (Photo: Angelina Nikolau/Instagram)
-
तिची ही छायाचित्रे जमिनीपासून शेकडो फूट उंचीवर टिपण्यात आली आहेत. एंजेलिनाची ही छायाचित्रे पाहणारा तिचा चाहता झाल्याशिवाय राहात नाही. आश्चर्याचा धक्का देणाऱ्या या छायाचित्रात ती उंच इमारतीच्या कठड्यावर बसलेली आहे. थोडा जरी तोल गेल्यास तिच्या जिवावर बेतू शकले असते अशी ही पोझ आहे. (Photo: Angelina Nikolau/Instagram)
-
श्वास रोखणाऱ्या या छायाचित्रांमुळे रशियाच्या मॉस्को शहरात राहणाऱ्या या मॉडेलची जगभरात ओळख निर्माण झाली. रशियातील माध्यमांनी एंजेलिनाला ‘a self-taught photographer, adventurer and roofer’ असे संबोधले. गगनचुंबी इमारतींच्या कठड्यावरून सेल्फी काढणाऱ्यांसाठी ही विशेषणे लावली जातात. (Photo: Angelina Nikolau/Instagram)
-
गगनचुंबी इमारतीच्या कठड्यावर शॉर्ट आणि टॉप परिधान करून अशी पहुडली आहे, जणुकाही समुद्रकिनारी सनबाथ घेत रिलॅक्स करत असावी. प्रत्येक क्षणाची मजा लुटा असा संदेश तिने या छायाचित्रासह लिहिला आहे. (Photo: Angelina Nikolau/Instagram)
-
एंजेलिनाच्या निर्भीडतेचा अंदाज तिच्या या छायाचित्रावरून येतो. जिवावर बेतणारे कारनामे करणाऱ्या एंजेलिनाला अनेक तरुणींनी काळजी घेण्याचा सल्लादेखील दिला आहे. या फोटोशूटनंतर तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली. (Photo: Angelina Nikolau/Instagram)
संजय राऊत रुग्णालयात दाखल…