-
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत ठाणे हा मराठा बहुल जिल्हा नसल्यामुळे मुंबईच्या वेशीवरील हा मोर्चा कितपत यशस्वी होईल, याविषयीच्या तर्कवितर्काना पूर्णविराम देत ठाण्यात रविवारी लाखोंच्या सहभागाने मराठा मोर्चा निघाला. (छाया – दीपक जोशी)
-
ठाणे शहरासह वसई, विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर या शहरांपासून ते मुरबाड, शहापूर आणि पालघरच्या ग्रामीण भागांतील नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन सरकारविरोधात आसूड उगारला. (छाया – दीपक जोशी)
-
व्यासपीठावर मुलींनी मराठा समाजाच्या मागण्यांचे बेधडक निवेदन केले. (छाया – दीपक जोशी)
-
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिंगणात बसून मिळवलेले अग्रस्थान, पारंपरिक वेशभूषेत बाईकस्वारी करत केलेले मोर्चाचे नेतृत्व अशा विविध भूमिकांमध्ये वावरणाऱ्या स्त्रीशक्तीचे एक आगळेवेगळे दर्शन रविवारी ठाण्यात घडले. सर्व वयोगटांतील महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. (छाया – पीटीआय)
-
तीन हात नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या या मोर्चासाठी महिलांचा स्वतंत्र गट तयार करण्यात आला होता. शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी, गृहिणी आणि नोकरदार महिलांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. (छाया – दीपक जोशी)
-
मराठा क्रांती मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच मोर्चातील प्रत्येक हालचालीवर नजर राहावी यासाठी सात ड्रोनचा वापर करण्यात आला होता. या ड्रोनच्या माध्यमातून मोर्चातील गर्दीचे छायाचित्र टिपण्याचे कामही सुरू होते. (छाया – दीपक जोशी)
-
एरवी पादचारी आणि वाहनचालकांच्या नाकीनऊ आणणारे फेरीवाले आणि वाहतूक कोंडी यापासून ठाणेकरांना रविवारी एका दिवसापुरती मुक्ती मिळाली. मराठा मोर्चासाठी ठाणे पोलिसांनी वाहतुकीचे काटेकोर नियोजन केल्याने महामार्गासह शहरात कोठेही कोंडी झाली नाही. (छाया – दीपक जोशी)
-
रविवारी ठाण्यात निघालेल्या मराठा मोर्चामुळे शहरातील खाद्य तसेच कापड विक्रेत्यांची चंगळ झाली. सांगली-साताऱ्याहून आलेल्या विक्रेत्यांनी मोर्चात भगवा रंग भरला. ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा छापलेल्या भगव्या टोप्या, फेटे, काळ्या रंगाचे टी शर्ट यांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. (छाया – दीपक जोशी)
-
ठाणे, पालघर, नवी मुंबईतील मराठा बांधवांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा फारसा ताण आला नाही. रविवारी मोर्चा आहे, हे माहीत असल्याने बहुतांश ठाणेकरांनी घरी राहणेच पसंत केले. (छाया – दीपक जोशी)
-
मोर्चामध्ये पावणेतीन महिन्यांची आराध्या मोहिते सहभागी झाली होती. तिच्या डोक्यावर भगव्या रंगाची ‘एक मराठा लाख मराठा’ असा संदेश असलेली टोपी होती. आराध्या बाबागाडीत बसल्याने तिच्या गाडीलाही ‘मराठा क्रांती मोर्चा जिल्हा ठाणे’ अशी पाटी लावण्यात आली होती. (छाया – दीपक जोशी)
-
ऑक्टोबर हीट आणि रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता आबालवृद्धांसह महिलांनी मराठा मोर्चामध्ये मोठा सहभाग नोंदवला होता. मात्र जसजशी उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानंतर त्याचा फटका मोर्चेकऱ्यांना जाणवू लागला. (छाया – दीपक जोशी)
-
ठाणे पश्चिम स्थानकातून बससह खासगी वाहनांना प्रवेश बंदी केली होती. कॅडबरी, गोल्डनडाईज नाका, नितीन कंपनी, कळवा, तीनहात नाका या भागांतही वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. (छाया – दीपक जोशी)
संजय राऊत रुग्णालयात दाखल…