-
२००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर मास्टर ब्लास्टर सचिनवर चेंडू सोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली सचिनला एका सामन्यावर बंदीसुद्धा घालण्यात आली. भारताने बंदीला विरोध केल्यानंतर आयसीसीने सचिनवरील बंदी हटवली होती.
-
१९९६ मध्ये माजी पाकिस्तानी कर्णधार इम्रान खानने बाटलीच्या टोपणाने चेंडू जुना करण्याचा प्रयत्न केला होता.

झिम्बाब्वेविरूद्धच्या २००४ मध्ये खेळल्या गेलेल्या व्हीबी सीरीजमध्ये राहुल द्रविड खाण्याची वस्तू चेंडूला घासत असल्याचे कॅमेरात कैद झाले होते. नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी द्रविडवर ५० टक्के मानधनावर कात्री लावण्यात आली होती. -
जानेवारी २०१० मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिदी चेंडूशी छेडछाड करताना आढळला होता. चेंडू अधिक वळविण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते.
-
२००२ आणि २००३ मध्ये शोएब अख्तर चेंडूसोबतत छेडछाड केल्याने दोषी ठरला होता.
-
२००२ मध्ये पाकिस्तानचा गोलंदाज वकार यूनूस असा पहिला क्रिकेटर बनला ज्याला आंतरराष्ट्रीय चेंडूशी छेडछाड केल्याच्या आरोपावरुन निलंबित करण्यात आले.
संजय राऊत रुग्णालयात दाखल…