-
केदारकांता हे हिमालयाच्या कुशीतलं १२५०० फूटांवरचं एक शिखर आहे.

गेल्या काही वर्षांमध्येच ट्रेकर्ससाठी हे नंदनवन झालं असून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत अक्षरश: हजारो ट्रेकर्स केदारकांताला येतात. 
उत्तराखंडमधल्या डेहराडूनपासून साधारणपणे १८० किलोमीटर तर मसुरीपासून १५० किलोमीटरवर सांकरी नावाचं छोटंसं गाव आहे, हे गाव म्हणजेच केदारकांताचा बेस कँप. 
साधारणपणे ८००० फूटांवर असलेलं सांकरी गाव एकदा सोडलं की पुढे वस्तीच नाही, त्यामुळे वीज नाही, पाणी नाही, मोबाईलची रेंजदेखील नाही, असतो चारही बाजूला फक्त बर्फच बर्फ. -
सांकरीहून निघालो की जुदा तलाव, ल्हुहासू असे मधले टप्पे एकेक दिवशी पार करत लागतो केदारकांताचा टप्पा.
-
सांकरीहून निघाल्यापासून ते केदारकांतापर्यंत सगळीकडे बर्फच असतं आणि तापमान उणे १७ डिग्री इतकं घसरतं, त्यामुळे थंडी नी बर्फ या दोघांची मजा घ्यायची असेल तर केदारकांता एकदम चांगली जागा आहे.
-
टूर ऑपरेटर्सच्या किंवा स्थानिकांच्या मदतीनं तंबूची, खाण्यापिण्याची तसेच गाईड्सची वगैरे सगळी व्यवस्था माफक दरात होते.

मध्यम ते अवघड प्रकारात हा ट्रेक मोडणारा असून सांकरी – केदारकांता – सांकरी अशा चार ते सहा दिवसांच्या ट्रेकचा एकूण दरडोई खर्च पाच ते सात हजार रुपयांच्या आसपास होतो. -
ज्यांना बर्फात खेळण्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचाय, ट्रेकचा आनंद लुटायचाय आणि ते ही माफक खर्चात, तर त्यांनी केदारकांताला अवश्य भेट द्यावी. अर्थात, सुरक्षिततेच्या दृष्टीनं अनुभवी टूर ऑपरेटर्स अथवा स्थानिकांची मदत घेऊनच हा ट्रेक करावा.
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा