-
भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होतो आहे. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला. (छाया सौजन्य- दूरदर्शन)
-
राजपथावर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी संचलन केले. देशाचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)
-
या संचलनात हवाई दलाच्या थक्क करणाऱ्या कसरती पाहायला मिळाल्या. भारतीय हवाई दलाचे लढाऊ हेलिकॉप्टर रुद्र पहिल्यांदाच या संचनलात दिसले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)
-
हवाई दलातर्फे करण्यात आलेल्या संचलनात २१ लढाऊ विमाने, १२ हेलिकॉप्टर आणि ५ ट्रान्सपोर्टर सहभागी झाले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)
-
या संचलनात आसियानच्या झेंड्यासह एक Mi- 17 V5 हे विमानंही सहभागी झाले. (छाया सौजन्य- दूरदर्शन)
-
१९ ते ३० जानेवारीदरम्यान आसियान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या समारंभात १० आसियान देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. (छाया सौजन्य- दूरदर्शन)
-
वायूदलाच्या 38 लढाऊ विमानांचा सहभाग (छाया सौजन्य- दूरदर्शन)
-
परेडच्या शेवटी भारतीय वायूदलाच्या कसरती (छाया सौजन्य- दूरदर्शन)
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा