-
अमेरिकेच्या स्पेसएक्स SpaceX कंपनीने बुधवारी जगातील सर्वाधिक ताकदीच्या ‘स्पेस एक्स फाल्कन हेवी’ SpaceX Falcon Heavy या रॉकेटचे प्रक्षेपण केले.
-
फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथील नासाच्या ऐतिहासिक प्रक्षेपण केंद्रातून ‘फाल्कन’ अवकाशात झेपावले.

या रॉकेटसोबत एलन मस्कची स्पोर्ट्स कारही अवकाशात पाठवण्यात आली आहे. अवकाश क्षेत्रातील ही येत्या काळातील आव्हाने असतील. 
‘फाल्कन’ ६३.८ टन वजनांचे रॉकेट असून, हे वजन जवळपास दोन अंतराळ यानांच्या बरोबरीचे आहे. २३० फूट लांबीच्या या रॉकेटमध्ये २७ मर्लिन इंजिन लावण्यात आले आहेत. -
भविष्यात या रॉकेटच्या सहाय्याने मानवाला चंद्र आणि मंगळावर पाठवता येणार असल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात येत आहे.
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा