-
पुतळा सोलापूर येथील शिल्पकार सागर रामपूरे यांनी 'अनाथांची माय' अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे शिल्प साकारले आहे. सध्या सिंधुताईंच्या या शिल्पाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर चांगलेच व्हायरल होत आहे. पाहुयातच हेच व्हायरल होणारे फोटो. (फोटो सौजन्य: Sagar Rampure Designs फेसबुकपेजवरून)
-
एका वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर सागरने हे शिल्प साकारले आहे.
-
विशेष म्हणजे हे मातीचे शिल्प नसून सिलिकॉनपासून ते साकारण्यात आलं आहे.
-
हे शिल्प बनवण्यासाठी सागरने सिंधूताईंचे खास फोटोशूट केले होते.
-
या फोटोंच्या सहाय्याने त्याने एका वर्षात हे शिल्प साकारले.
-
सिलिकॉन आणि रबरापासून हे शिल्प बनवल्यामुळे त्यात अधिक जिवंतपणा आला आहे.
-
हे शिल्प साकारण्यासाठी सागरला २० सहकाऱ्यांनी मदत केली.
-
सोलापुरमधील सागरच्या स्टुडिओमध्ये हे शिल्प पाहता येईल.
दोन दोन दिवस पोट साफ होत नाही? रात्री फक्त ‘या’ पानांचं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ