सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहत असून मालाडमधील नवयुवक मित्र मंडळाने दोऱ्याच्या सहाय्याने गणपतीची मुर्ती साकारली आहे. हा संपूर्ण गणपती दोऱ्यापासून तयार केला असून ३ हजार मीटर दोरा वापरण्यात आला आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती ) मालाडमधील युवा ग्रुप मित्र मंडळाने ९ फूट उंच बांबूपासून गणराजाची मुर्ती तयार केली आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती ) कांदिवलीमधील गणेश साई सेवा मंडळाने मक्याच्या वाळलेल्या दाण्यांपासून १४ फूट उंच गणपतीची मुर्ती तयार केली आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती ) इंद्रवन मित्र मंडळाने यंदा सापशिडीच्या खेळातील फाश्यांच्या सहाय्याने बाप्पाची मुर्ती साकारली आहे. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती ) लहान मुलांना शाळेत लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे पेन्सिल. या पेन्सिलच्या सहाय्याने शंकर गल्ली सपूर पाडा येथे १२ हजार पेन्सिलच्या सहाय्याने गणराजा साकारण्यात आले आहेत. ( छायाचित्र सौजन्य : अमित चक्रवर्ती )

Sambhajiraje Chhatrapati : रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा, संभाजीराजे छत्रपतींनी दिली ‘यंत्रराज’ची माहिती