-
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदान करुन, सर्वांना आपला मदतानाचा हक्क बजावण्याची विनंती केली आहे. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
-
सुप्रिया सुळे यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
-
नितिन गडकरी यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
-
विद्यमान आमदार आणि ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
-
उदयनराजे भोसले यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
-
भाजपाचे पनवेलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
-
राधाकृष्ण विखे-पाटलांनी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे-पाटील. खासदार सुजय विखे-पाटील आणि धनश्री विखे-पाटील यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.
-
मंदा म्हात्रे यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
-
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.
-
ऐरोली मतदार संघात गणेश नाईकांनी केलं मतदान
-
अजित पवार यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
-
माण विधानसभा मतदारसंघातील आमचं ठरलंय टीमचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे (ता. माण) येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांनीही मतदान केले.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती