-
आपण कितीही पट्टीचे चालक असलो तरी दुसऱ्याच्या चुकीमुळे किंवा थोडं जरी लक्ष विचलित झालं तर अपघात होऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईमधील एका शोरुममध्ये अशाच प्रकारे गाडी पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळल्याची घटना घडली होती. मात्र अमेरिकेमध्ये तर याहून अधिक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने चक्क स्विमिंग पूलमध्ये गाडी घातली.
-
फ्लोरिडामधील वेस्ट पाम बिच पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडलेल्या एका विचित्र अपघाताचा फोटो आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये एका महिलेने चक्क स्विमिंग पूलमध्ये गाडी घातल्याचे दिसत आहे.
-
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार गाडी चालवणाऱ्या महिलेचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी हॉटेल इनच्या मागच्या बाजूचे कुंपण तोडून थेट स्विमिंग पूलमध्ये गेली.
-
"नशिबाने या अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी झालं नाही. चालक आणि तिच्याबरोबरच्या प्रवाशाने वेळीच बाहेर उडी मारल्याने दोघेही वाचले," असं पोलिसांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
गाडी मागे घेत असतानाच चुकून जास्त रेस केल्याने गाडी थेट स्विमिंग पूलमध्ये बुडाली.
-
गाडीतील महिला चालक आणि तिच्याबरोबरच्या सहप्रवाशाने गाडी पाण्यात जात असताना खिडकीमधून बाहेर उडी मारल्याने ते वाचले.
-
या प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणताही गंभीर गुन्हा दाखल केलेला नाही.
-
स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढली.
-
ही घटना सध्या स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
-
सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी चालकाची खिल्ली उडवली आहे. काहींनी हे चूकून झालं नसून या महिलेने स्विमिंग पूलमध्ये गाडी पार्क केल्याचा टोला लगावला आहे.
-
अनेकांनी या पोस्टवर मजेदार कमेंटस दिल्या आहेत.

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर