-
पाकिस्तानला जेरीस आणणारे भारताचे जेम्स बॉण्ड अर्थात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा आज ७५ वा वाढदिवस. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर डोवाल यांच्याकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद कायम ठेवण्यात आले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
-
उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये डोवाल यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अजमेर सैनिक स्कूलमध्ये झालं आहे. आग्रामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलं.
-
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या माध्यमांतून पाकिस्तानमध्ये सात वर्ष राहत डोवाल यांनी भारतासाठी हेरगिरी करत माहिती पुरवली.
-
अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.
-
२०१४ साली नरेंद्र मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले. तेव्हापासून अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पंतप्रधान मोदींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.
-
१९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात डोवाल यांचा महत्वाचा वाटा होता.
-
१९८४ मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात डोवाल सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते.
-
उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात डोवाल यांचा महत्वाचा वाटा होता.
-
भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक २’मध्येही डोवाल यांचा महत्वाचा वाटा होता.
-
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर डोवाल यांनी जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे.
-
-
डोवाल यांना मागील वर्षी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. डोवाल हे पाच वर्ष या पदावर कार्यरत असतील. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
-
भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटल्यानंतर डोवाल स्वत: जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. तेथील स्थानिकांबरोबर चर्चा करत जेवतानाचे त्यांचे फोटो बरेच चर्चेत होते.
-
देशात सर्वाधिक सुरक्षा असणाऱ्या अती महत्वाच्या व्यक्तींमध्ये डोवाल यांचा समावेश आहे.
-
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटामध्ये डोवाल यांची भूमिका परेश रावल यांनी साकारली होती.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक