-
रशियामध्ये तर स्पुटनिक व्ही या लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांमध्ये लशी चाचणीच्या तिसऱ्या फेजमध्ये आहेत. त्यामुळे या देशात सर्वात आधी करोनाला रोखणारी लस उपलब्ध होऊ शकते.
-
दरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावरील लशी संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.
-
अमेरिकेत ऑक्टोंबर महिन्यापासून करोना व्हायरसवरील लशीचे वितरण सुरु होऊ शकते असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
-
ट्रम्प यांच्या स्वत:च्या प्रशासनातील आरोग्य अधिकाऱ्या सार्वजनिकपणे लशीच्या उपलब्धतेबद्दल जे विधान केले होते, त्यापेक्षा ट्रम्प यांचा दावा बिलकुल वेगळा आणि खूप आशावादी आहे.
-
"तुम्हाला माहितच असेल करोना लस बनवण्याच्या आपण खूपच जवळ पोहोचलो आहोत. ऑक्टोंबर महिन्यपासून लशीकरणाचा कार्यक्रम सुरु होऊ शकतो असे आम्हाला वाटते" असे डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
"लस पुरवठयासाठी सर्व आवश्यक उत्पादन अमेरिका करेल. वर्षअखेरपर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांना १० कोटी लसीच्या डोसचे वितरण करणे शक्य होईल" असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सीएनबीसी ने हे वृत्त दिले आहे.
-
"ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरपासून अमेरिकेत लशीचे वितरण सुरु होईल. त्यापेक्षा जास्त उशिर होईल, असे मला वाटत नाही" असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
-
"नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून लसीकरण सुरु होऊ शकते. पण ते मर्यादीत स्वरुपात असेल. ज्यांना सर्वाधिक गरज आहे अशा वर्गाला आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लशीचे डोस दिले जातील" असे डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड सिनेच्या सुनावणीत खासदारांसमोर म्हणाले होते.
-
-
"पुढच्या उन्हाळयापर्यंत सर्वसामान्यांसाठी मोठया प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाही, हे विधान रेडफिल्ड यांनी चुकून केले असावे" असे ट्रम्प यांनी सांगितले. (Photo: Reuters)
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा