-
भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक रुचिर शर्मा यांच्याशी एका पॉडकास्टमध्ये झालेल्या संवादात, झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीबद्दल एक आश्चर्यकारक माहिती उघड केली आहे.
-
निखिल कामथ म्हणाले की, “२००० च्या दशकाच्या सुरुवातीला मी बंगळुरूच्या एका कॉल सेंटरमध्ये काम करून वर्षाला फक्त १ हजार डॉलर्स कमवायचो.”
-
दुसरीकडे रुचिर शर्मा यांची परिस्थिती अगदी उलट होती. शर्मा यांनी सांगितले की, १९९६ मध्ये ते २२ वर्षांचे असताना मॉर्गन स्टॅनलीने त्यांना १ लाख डॉलर्सची नोकरी देऊ केली होती.
-
आर्थिक जगतात आता एक सुप्रसिद्ध नाव असलेले शर्मा यांनी भारतातील पहिल्या मोठ्या परदेशी कंपन्यांपैकी एक असलेल्या मॉर्गन स्टॅनलीने त्यांची प्रतिभा कशी ओळखली याबाबतही सांगितले. ते म्हणाले, “मी पीएचडी करण्यासाठी तयारी करत होतो. पण त्यांनी मला विचारले, ‘तुम्हाला अभ्यास करायचा आहे की पैसे कमवायचे आहेत?’ मी पैसे निवडले. ही ऑफर आयुष्य बदलून टाकणारी होती.”
-
यानंतर निखिल कामथ यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीवर प्रकाश टाकला. जे ऐकूण रुचिर शर्मा आश्चर्यचकित झाले. कामथ म्हणाले, “तुमच्यानंतर पाच वर्षांनी मी बंगळुरूमधील एका कॉल सेंटरमध्ये वर्षाला १ हजार डॉलर्स कमवत होतो.” यावर शर्मा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, “तुम्ही कॉल सेंटरपासून कारकिर्दीची सुरुवात केली? हे आकर्षक आहे!”
-
याच पॉडकास्टमध्ये, या दोघांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. जोपर्यंत मोठ्या संरचनात्मक सुधारणा केल्या जात नाहीत तोपर्यंत ६ टक्क्यांपेक्षा जास्त विकास होण्याची शक्यता नाही असे शर्मा म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, भारत पारंपारिकपणे सेवा क्षेत्राद्वारे चालवला जात असला तरी, संपत्ती निर्मितीचा पुढील मोठा टप्पा उत्पादन क्षेत्रातून येईल.
-
शर्मा यांनी पुढे नमूद केले की, उत्पादन उद्योगातील अब्जाधीशांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि जर भारताने आपली बाजारपेठा खुली केली आणि स्पर्धात्मक दृष्टीकोन ठेवला तर ही देशासाठी मोठी संधी असू शकते.
-
निखिल कामथ हे भारतीय शेअर बाजार क्षेत्रातील एक प्रमुख नाव आहेत. ते २०१० मध्ये स्थापन झालेल्या स्टॉकब्रोकिंग कंपनी झेरोधाचे सह-संस्थापक आहेत.
-
निखिल यांनी नोकरी सोडून भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामथ असोसिएट्स कंपनी सुरू केली. त्यानंतर, २०१० मध्ये, त्यांनी झेरोधाची स्थापना केली, जी भारतातील सर्वात मोठी डिस्काउंट ब्रोकरेज कंपनी आहे. (All Photos: Nikhil Kamath/X)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान