-
भारतीय क्रिकेट संघाचा विश्वासू फलंदाज अजिंक्य रहाणेचा आज वाढदिवस. त्याला टि्वटरवर सकाळपासूनच शुभेच्छा मिळत आहेत. रहाणेच्या वाढदिवसावरून त्याच्या चाहत्यांमध्ये काहीसा संभ्रम होता. नंतर स्वत: अजिंक्यनेच आपला वाढदिवस ६ जूनला असल्याचे टि्वटरवर पोस्ट केले. (EXPRESS ARCHIVE)
-
फलंदाजीतला तंत्रशुध्दपणा आणि क्षेत्ररक्षणातील चपळतेसाठी अजिंक्यला ओळखले जाते. मैदानाबाहेर त्याने कराटेचे प्रशिक्षण घेतले असून, ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. (EXPRESS ARCHIVE)
-
लहानपणीची आठवण सांगताना त्याचा मित्र अमित म्हणाला की, एकदा गोलंदाजाने टाकलेला चेंडू अजिंक्यच्या हेल्मेटला लागल्याने अजिंक्य जमिनीवर कोसळला. दुखापतग्रस्त अजिंक्य मैदान साडण्यास नकार देते मैदानावर टिकून राहिला आणि पुढील पाच चेंडूवर त्याने पाच चौकार लगावले. (EXPRESS ARCHIVE)
-
भारतीय क्रिकेटमध्ये 'दी वॉल' म्हणून प्रसिध्द असलेल्या राहुल द्रविडला अजिंक्य आपला आदर्श मानतो. द्रविडकडून त्याने तंत्रशुध्द फलंदाजीच्या टिप्स घेतल्या आहे. (EXPRESS ARCHIVE)
-
रहाणेने २०१२ च्या आयपीएलमध्ये एका षटकामध्ये ६ चौकार लगावले होते. टी-२० क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा रहाणे पहिला क्रिकेटपटू आहे. (EXPRESS ARCHIVE)
-
२०१६ च्या आयपीएलमध्ये तो 'पुणे सुपरजायेंटस'कडून खेळला होता. १४ सामन्यांमध्ये ४३.६३ च्या सरासरीने त्याने ४८० धावा काढल्या होत्या. (EXPRESS ARCHIVE)
-
२०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यातून रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जास्त करून तो भारताबाहेर कसोटी सामने खेळला असून, त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. केवळ बांगला देश आणि दक्षिण अफ्रिका सोडून अन्य सर्व संघांविरुध्द कसोटी क्रिकेटदरम्यान त्याने शतक नोंदविले आहे. (EXPRESS ARCHIVE)
-
ऑगस्ट २०१५ मधील श्रीलंकेविरुध्दच्या एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल पकडण्याचा जुना विक्रम त्याने मोडीत काढला. या सामन्यात त्याने आठ झेल टिपले. मजेची गोष्ट म्हणजे यातील ७ झेल त्याने स्लिपमध्ये टिपले. (EXPRESS ARCHIVE)
-
कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतकाची नोंद करणारा रहाणे पाचवा भारतीय फलंदाज आहे. हा पराक्रम त्याने २०१५ साली दिल्लीच्या फिरोज शहा कोटला स्टेडियमवर केला होता. (EXPRESS ARCHIVE)
-
अजिंक्य रहाणे ( संग्रहीत छायाचित्र )
-
अजिंक्य रहाणे २६ सप्टेंबर २०१४ रोजी आपली बालपणीची मैत्रीण राधिका धोपवकरसोबत लग्नबंधनात अडकला. (TWITTER)

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका