-
रोहित शर्मा आणि शिखर धवन ही भारताची सलामीची जोडी चांगल्या फॉर्मात आहे. दोन्ही फलंदाजांना सूर सापडला तर त्यांना थांबवणं भल्या-भल्यांना शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
-
केदार जाधवच्या संघातील सहभागावरुन अनेक शंका होती. मात्र रवाना होण्याआधी फिजीओ पॅट्रीक फराहत यांनी केदार तंदुरुस्त असल्याचा अहवाल देत केदारच्या सहभागावर मोहर उमटवली.
-
रोहित आणि कुलदीप यादवसोबत केदार जाधव.
-
लोकेश राहुलला या विश्वचषकात पर्यायी सलामीवीराची भूमिका बजावायची आहे.
-
विमान पकडण्याआधी मोहम्मद शमी, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार विमानतळावर आपला वेळ घालवताना.
-
आजकाल सर्वांवर पब-जी या खेळाचं गारुड निर्माण झालंय. मग यातून आपले क्रिकेटक कसे बरं सुटतील. धोनी, चहल आणि अन्य खेळाडू यावेळी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असलेले दिसले.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा