-    भारतीय संघामधील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा सध्या आयपीएलसाठी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये आहे. 
-    हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल हे दोघे मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतात. 
-    आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी पांड्या बंधू नुकतेच आबू धाबीला पोहचले आहेत. 
-    तशी पांड्या बंधूंची मैदानावरील कामगिरीच फार बोलकी असते असं म्हटल्यासं चुकीचं ठरणार नाही. 
-    मुंबई इंडियन्सच्या संघातील आघाडीचे खेळाडू म्हणून या दोघांकडं पाहिलं जातं. 
-    मुंबईने आयपीएल चषक जिंकण्यामध्ये या दोघांचाही मोलाचा वाटा आहे. 
-    लेट्स बॅट डू द टॉकिंग पद्धतीने पांड्या मैदानात उतरल्यावर खेळतात. 
-    अर्थात आयपीएलप्रमाणेच ते भारतीय संघात खेळतानाही आपल्या कामगिरीची छाप सोडतात. 
-    सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये दोन्ही पांड्या बंधूंचा समावेश होतो. 
-    लहानपणापासूनच या दोघांनी भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. 
-    एकेकाळी हार्दीक आणि त्याच्या भावाने मॅगी खाऊन दिवस काढलेत. मात्र आपल्या कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी भारतीय संघामध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण करत आतापर्यंत यशस्वी वाटचाल केलीय. 
-    मैदानाबाहेर पांड्या हे त्यांच्या लाइफ स्टाइलसाठी ओळखले जातात. 
-    तसे पांड्या बंधू आणि त्यातही खास करुन हार्दिक हा त्याच्या लाईफस्टाइलसाठी आणि फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. 
-    हार्दीकला आलिशान गोष्टींचा फार शौक आहे. 
-    अगदी महागड्या ब्रॅण्डच्या कपड्यांपासून ते गाड्यांपर्यंत अनेक गोष्टी हार्दीककडे आहेत. 
-    त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून कायमच त्याच्या या आलीशान लाइफ स्टाइलची झलक दिसून येते. 
 - काही आठवड्यांपूर्वीच पांड्या बंधूंनी मुंबईमध्ये एक अल्ट्रा आलिशान आठ बीएचकेचं घर विकत घेता आहे. 
-    समोर आलेल्या माहितीनुसार या बंगल्याची अंदाजित किंमत ३० कोटींच्या आसपास आहे. 
-    पांड्या बंधूंचं हे घर ३८३८ स्वेअर फुटांचं आहे. 
-    सध्या हार्दीक चर्चेत आहे तो त्याच्या अशाच एका आलिशान गोष्टीमुळे म्हणजेच त्याच्या महागड्या खरं तर अती महागड्या घड्याळामुळे. 
-    युएईमध्ये नुकताच हार्दीक रोल्स रॉयल कालिननमध्ये दिसून आला. 
-    त्याने गाडीमध्ये बसून काढलेले काही सेल्फी पोस्ट केलेत. 
-    हार्दीक टँक टॉप, टोपी आणि चष्मा अशा कूल लूकमध्ये दिसून आला. 
-    सध्या हार्दीक युएईमध्ये भटकंती करतोय, असं या फोटोंमधून दिसून येत आहे, 
-    त्याने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यावेळी काढलेले काही फोटो शेअर केलेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चा त्याच्या घड्याळाची आहे. 
-    हार्दीकचं घड्याळ हे पाटेक फिलिक कंपनीचं असून या मॉडेलचं नाव आहे, नॉटिलस प्लॅटिनम ५७११. 
-    या घड्याळाचं वैशिष्ट्य म्हणजे घड्याळामध्ये हिरव्या रंगाचे पाचू आहेत. घड्याळ पूर्णपणे प्लॅटिनमने बनवण्यात आलं आहे. 
-    हे घड्याळ सेल्फ-वाइण्डींग ऑटोमॅटिक मूव्हमेंटच्या फिचरसहीत येतं. या घड्याळामध्ये ४५ तासांची बॅटरी टिकू शकते. 
-    प्लॅटिनम ५७११ ची ही घड्याळांची रेंज फारच दुर्मिळ असून त्यात हिरवा रंग हा अगदीच क्वचित पहायला मिळतो. 
 - हार्दीकच्या या घड्याळाची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे. (सर्व फोटो हार्दीक पांड्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार) 
 
  INDW vs AUSW: भारत वर्ल्डकप जिंकला तर मी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर.., सुनील गावसकरांनी दिलं वचन 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  