-
पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून श्रेयस अय्यरने स्वत:ला खास विक्रमात सामावून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने दमदार शतक ठोकले.
-
श्रेयसने आपल्या खेळीत १०५ धावांची खेळी केली, ज्यात दोन षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. अय्यरच्या फलंदाजीने कानपूरच्या लोकांना वेड लावले. लोकांनी स्टँडवर ‘दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ अशा घोषणाही दिल्या.
-
श्रेयसच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांची बहीण श्रेष्टा अय्यर एक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावरही तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.
-
श्रेष्टा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या कामाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. श्रेयस अय्यरनेही आपल्या बहिणीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दोघेही अनेकदा एकत्र मस्ती करताना दिसतात.
-
श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. तो टीम इंडियासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघात खेळला आहे. आयपीएलमध्ये श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारही होता.
-
श्रेष्टा स्वतःला प्राणी प्रेमी असल्याचे सांगते. तिचे सोशल मीडियावर अनेक रिल व्हिडिओ आणि फोटो आहेत.
-
अय्यर कुटुंब मुंबईत राहते. पण ते मूळचे केरळचे आहेत.

मुलाचं ऐश्वर्या रायशी होतं अफेअर; विवेक ओबेरॉयचे वडील म्हणाले, “जेव्हा सलमान खान मला भेटतो तेव्हा…”