-
आयपीएलच्या यंदाच्या पर्वाचे सर्व साखळी सामने संपले आहेत. आता क्रिकेट चाहत्यांना अंतिम सामन्याचे वेध लागले आहे.
-
एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
-
या संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून यावेळी दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
-
याच कारणामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. नेटकरी, संजू सॅमसनपासून ते शिखर धवनपर्यंत वेगवेगळ्या खेळाडूंना संघात सामील करायला हवे होते, असे म्हणत आहेत.
-
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करतोय. हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. या हंगामात सॅमसनने चांगला खेळ केलेला आहे. मात्र त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
-
संजू सॅमसनला दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेमध्ये स्थान द्यायला हवे होते, असे नेटकरी म्हणत आहेत.
-
तसेच या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीलादेखील संघात स्थान दिलेले नाही. त्याने या हंगामात ४१३ धावा केलेल्या आहेत. त्याचा खेळ पाहून त्याला भारतीय संघात स्थान देण्यात यावे, असे क्रिकेट चाहते म्हणत आहेत.
-
पंजाब किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या शिखर धवनलादेखील यावेळी भारतीय टी-२० संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे नेटकरी नाराजी व्यक्त करत असून तो वरिष्ठ खेळाडू असून त्याला संघात स्थान द्यायला हवे होते असे म्हटले जात आहे.
-
गुजरात टायटन्सकडून खेळणारा राहुल तेवतीया आयपीएलच्या या पर्वात चांगलाच तळपला. मात्र त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले नाही. त्यालादेखील संघात स्थान द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
-
बीसीसीआयने पृथ्वी शॉकडेही दुर्लक्ष केल्याचे नेटकरी म्हणत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. याच कारणामुळे त्याला टी-२० संघात स्थान द्यायला हवे होते असे नेटकरी म्हणत आहेत.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल