-
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या वादात सापडला आहे. पृथ्वी शॉने पंचतारांकित हॉटेलमध्ये सेल्फी न दिल्याने काही लोकांनी कारवर हल्ला केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दिली आहे. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)
-
ओशिवरा पोलिसांनी सपनाला अटक करून तिला ताब्यात घेतले. पृथ्वी शॉने हे प्रकरण शांत करण्यासाठी सपना आणि तिच्या सहकाऱ्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोपही केला. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)
-
पृथ्वी शॉ आणि सपना गिलचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही भांडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉच्या हातात एक काठी दिसत आहे. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)
-
सपना गिलला जामीन मिळाल्यानंतर तिने मुंबई विमानतळ पोलिस स्थानकात क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (फोटो- सौजन्य इंस्टाग्राम)
-
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा देखील वादांसाठी ओळखला जातो. त्याने अनेकवेळा चाहत्यांशी पंगा घेतला आहे. २०१७ मध्ये, बेन स्टोक्सने ब्रिस्टलमधील नाईट क्लबमध्ये एका व्यक्तीवर पंचांचा वर्षाव केला होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)
-
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. दरम्यान, एक पाकिस्तानी चाहता सतत ओरडत होता ‘बाप कौन है’, ज्यावर शमीने आपला संयम गमावला आणि त्या प्रेक्षकावर भडकला होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)
-
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या क्रिकेटच्या दिवसातील सर्वात मोठी समस्या म्हणजे तो लठ्ठ होता. त्यामुळे प्रेक्षक त्याची खिल्ली उडवायचे. (फोटो- सौजन्य ट्विटर)
-
याच्याशी संबंधित एक प्रसिद्ध घटना आहे, जेव्हा इंझमामला ‘बटाटा’ म्हटल्यावर राग आला आणि तो सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये आला. ही घटना सप्टेंबर १९९७ ची आहे, जेव्हा टोरंटो, कॅनडात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहारा कप एकदिवसीय सामना खेळला जात होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)
-
हसन अली स्थानिक क्रिकेट टूर्नामेंट खेळण्यासाठी गेला होता, तिथे ट्रोलर्सनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हसन अली स्टँडमधील ट्रोलर्सना मारहाण करण्यासाठी धावला होता. (फोटो- सौजन्य ट्विटर)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”