-
हार्दिक पांड्या हा भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्यांची एकूण संपत्ती कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. मात्र हार्दिक केवळ क्रिकेटमधून पैसे कमवत नाही. वास्तविक, तो अनेक ब्रँड्सही एंडोर्स करतो.
-
आयपीएल २०२४मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि T20 विश्वचषक २०२४साठी भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याला आयपीएलच्या सुरुवातीपासूनच टीकेला सामोरे जावे लागत आहे.
-
मात्र हार्दिक पंड्या हा अतिशय यशस्वी खेळाडू असून त्याच्याकडे मोठी संपत्ती आहे. आज आपण हार्दिक पंड्याची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेऊया.
-
२९ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पोर्ट्स कीडामध्ये दिलेल्या अहवालानुसार, हार्दिक प्रत्येक महिन्याला सुमारे १.२ कोटी रुपये कमावतो.
-
ही त्याच्या आधीच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. हार्दिकची कमाई बहुतांशी क्रिकेट खेळून आणि जाहिरातीतून होते.
-
हार्दिकचा बीसीसीआयशीही करार आहे. यातून त्याला दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात.
-
आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने हार्दिकला १५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. २०२४ च्या या मोसमात मुंबई इंडियन्सने त्याला तितकीच किंमत देऊन खरेदी केले आणि कर्णधार बनवले.
-
हार्दिक पंड्या ब्रँड एंडोर्समेंटमधून सुमारे ५५-६० लाख रुपये कमावतो. हार्दिक Halaplay, Gulf Oil, Star Sports, Gillette, Jaggle, Sin Denim, D:FY, Boat, Oppo, Dream11, Reliance Retail, Villain आणि SG क्रिकेट या ब्रँड्सचे एंडोर्समेंट करतो.
-
स्पोर्ट्स कीडामध्ये दिलेल्या अहवालानुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती सुमारे 91 कोटी रुपये आहे. (All Photos: Hardik/Instagram)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”