-
काल (२ मार्च) पार पडलेल्या २०२५ मधील रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाने विजय मिळवला, केरळ विरुद्ध विदर्भ असा हा सामना झाला होता.
-
दरम्यान, ‘रणजी ट्रॉफी’ ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. आज आपण रणजी ट्रॉफी या स्पर्धेला हे नाव कसे मिळाले याबद्दल जाणून घेऊयात.
-
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने म्हणजे बीसीसीआयने हे नाव माजी क्रिकेटपटू रणजीत सिंह यांच्या सन्मानार्थ दिले आहे.
-
रणजीत सिंह हे भारतासाठी कधी क्रिकेट खेळले नाहीत, ते इंग्लंडसाठी खेळले आहेत. १८९६ साली त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध इग्लंडसाठी कसोटीमधून पदार्पण केले. त्यावेळी भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे ते भारताचे पहिले खेळाडू होते.
-
रणजी ट्रॉफीमध्ये प्रादेशिक संघ एकमेकांना स्पर्धा देतात.
-
भारतातील विविध राज्यातील संघ यामध्ये एकमेकांचं क्रिकेट कौशल्य दाखवत त्यांचा उत्कृष्ट खेळ दाखवतात.
-
या स्पर्धेमध्ये भारतातील विविध सरकारी संस्थांचे संघ देखील सहभाग घेतात.
-
सर्वात आधी १९३४ मध्ये रणजीत सिंह यांच्या नावावरून ‘रणजी ट्रॉफी’ची घोषणा करण्यात आली होती.
-
१९३४ मध्ये पटियालाचे महाराज भूपिंदर सिंग यांनी बीसीसीआयला रणजी ट्रॉफी दान केली.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित आणि सोशल मीडिया) हेही पाहा- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार, २०२३ विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढणार?

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा