-
विराटची सचिन तेंडुलकरशी तुलना
अनेक खेळाडूंची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाते, विराट कोहलीही त्यापैकीच एक आहे. (Photo: Social Media) -
कसोटीमधून निवृत्त
विराट कोहलीने कसोटीतील निवृत्तीची घोषणा करताच, लोकांना कोहलीच्या करीअरबद्दल विविध प्रकारची माहिती मिळविण्यात रस निर्माण झालं आहे. (Photo: Social Media) -
कोणी केलेत जास्त द्विशतके
अनेकांना हेही जाणून घ्यायचे आहे की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यापैकी कोणाकडे कसोटी क्रिकेटमध्ये जास्त द्विशतके आहेत. याचबद्दल जाणून घेऊया… (Photo: Social Media) -
विराट कोहली आहे पुढे
कसोटी क्रिकेटमध्ये, सचिन तेंडुलकर इतर सर्व आकडेवारीत विराट कोहलीपेक्षा पुढे आहे, परंतु द्विशतक झळकावण्यात सचिन विराटपेक्षा मागे आहे. (Photo: Social Media) -
सचिनच्या नावावर ६ द्विशतके
सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ६ वेळा द्विशतके ठोकली आहेत. (Photo: Social Media) -
विराटच्या नावावर ७ द्विशतके
तर, विराट कोहलीने एकूण १२३ कसोटी सामने खेळले आहेत आणि ७ द्विशतके ठोकली आहेत. (Photo: Social Media) -
सचिन तेंडुलकर मागे आहे
अशाप्रकारे पाहिले तर, द्विशतकांच्या बाबतीत विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा पुढे असल्याचे दिसते. कारण सचिनने त्याच्यापेक्षा एक द्विशतक कमी केले आहे. (Photo: Social Media) -
इतर आकडेवारीत विराट मागे
दरम्यान, शतकांसह इतर आकडेवारीत विराट कोहली खूपच मागे आहे. सचिनने कसोटीत १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, तर विराटने ९२३० धावा केल्या आहेत. (Photo: Social Media) -
दोघांची शतकं
एकीकडे, सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत, तर विराट कोहलीने केवळ ३० शतके ठोकली आहेत. (Photo: Social Media) हेही पाहा- विराट कोहलीचा फिटनेस फंडा आहे तरी काय?, त्याचे ९०% जेवण ‘असे’ असते…

राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस