-
KL Rahul Net Worth: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)
-
राहुलला महागड्या गाड्या खूप आवडतात. तो त्याच्या लक्झरी लाईफमुळेही चर्चेत राहतो. इंग्लंडविरूूद्ध लीड्स कसोटीत शतक ठोकणाऱ्या राहुलची एकूण संपत्ती किती आहे?ते जाणून घेऊया… (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम)
-
किती आहे संपत्ती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलची एकूण संपत्ती ९९.८३ कोटी रुपये म्हणजे अंदाजे १०० कोटी रुपये आहे. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) -
उत्पन्नाचे स्त्रोत
राहुलकडे उत्पन्नाचे महत्त्वाचे तीन स्त्रोत आहेत. आयपीएल आणि टीम इंडियाच्या पगाराव्यतिरिक्त राहुल एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावतो. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) -
टीम इंडिया
केएल राहुलला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी वर्षाचे ५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्रपणे वेगळे मानधन दिले जाते. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) -
आयपीएल
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याव्यतिरिक्त, राहुलला प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्रपणे ७.५० लाख रुपये मॅच फी म्हणून मिळतात. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) -
ब्रँड एंडोर्समेंट
क्रिकेट व्यतिरिक्त, केएल राहुल ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील कमाई करतो. तो बोट, टाटा नेक्सन, रेड बुल आणि आरबीआयसाठी जाहिराती करतो. ज्यातून तो कोट्यवधी रुपये कमावतो. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) -
कार कलेक्शन
त्याच्याकडे अॅस्टन मार्टिन DB11, ऑडी R8 आणि लॅम्बोर्गिनी हुराकन स्पायडर सारख्या अनेक महागड्या कार आहेत. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) -
घर
त्याने अलीकडेच स्वतः साठी बंगळुरुमध्ये आलिशान घरही बांधले आहे. (फोटो: केएल राहुल इन्स्टाग्राम) हेही पाहा- Akshay Kumar Diet Tips: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ५७ व्या वर्षीही तंदुरुस्त अन् निरोगी; त्याचा डाएट प्लॅन काय?

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल