-
सुनील गावस्कर क्लबमध्ये केएल राहुल
केएल राहुल हा परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून १००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सुनील गावस्कर परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून १००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारे पहिले भारतीय फलंदाज आहेत. गावस्कर यांनी ही कामगिरी वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान या देशांमध्ये तीन वेळा केली आहे. (Photo: ANI) -
सुनील गावस्कर परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून १००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारे पहिले भारतीय फलंदाज आहेत. गावस्कर यांनी ही कामगिरी वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान या देशांमध्ये तीन वेळा केली आहे. (Photo: BCCI)
-
यशस्वी जैस्वालनेही केला चमत्कार
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने अर्धशतक (५८) झळकावले. तसेच त्याने इंग्लंडविरुद्ध १००० कसोटी धावाही पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध कसोटीत हा पराक्रम करणारा तो दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला. (Photo: ANI) -
केवळ १६ डावात हा पराक्रम करून त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दोघेही आता फक्त राहुल द्रविड यांच्या मागे आहेत, त्यांनी १५ डावात हा पराक्रम केला होता. (Photo: BCCI)
-
ऋषभ पंतचा विश्वविक्रम
ऋषभ पंत हा परदेशी भूमीवर १००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा जगातील पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. (Photo: ANI) -
कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात, कोणत्याही विकेटकीपरला दुसऱ्या देशात ही कामगिरी करता आलेली नाही. पंतच्या नावावर ऑस्ट्रेलियामध्येही ८७९ धावा आहेत. (Photo:BCCI)
-
केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांचे ४०० पार
पहिल्या दिवशी ४६ धावांची खेळी करत केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने ७ डावात ४२१ धावा केल्या आहेत. (Photo: ANI) -
या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो ऋषभ पंत (४६२ धावा) आणि शुभमन गिल (६१९ धावा) यांच्या मागे आहे. परदेशात कसोटी मालिकेत तीन भारतीय फलंदाजांनी ४०० पेक्षा जास्त धावा काढण्याची ही तिसरी वेळ आहे. सुनील गावस्कर, मोहिंदर अमरनाथ आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असे केले होते. राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांनी २००३-०४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ही कामगिरी केली होती. (Photo: BCCI)
-
१९३६ नंतर राहुल-जयस्वाल जोडीने बनवला विक्रम
यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या जोडीने मँचेस्टरमध्ये भारतासाठी कसोटीतील दुसरी सर्वोच्च सलामी भागीदारी नोंदवली. चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावा जोडल्या. सर्वाधिक सलामी भागीदारीचा विक्रम विजय मर्चंट आणि सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावर आहे. १९३६ मध्ये मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २०३ धावा जोडल्या होत्या. (Photo: BCCI) हेही पाहा- ‘सैयारा’मधील अभिनेत्री अनित पड्डाचे अनसीन फोटो; रियल लाइफमध्येही बोल्ड, तिचा ‘हा’ चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो