-
येत्या काही दिवसांत आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा टी -२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक गडी (टी – २० फॉरमॅट) बाद करणारे भारतीय गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने या स्पर्धेतील ४ सामन्यात गोलंदाजी करताना ६ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या जसप्रीत बुमराहने ५ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १५.६६ च्या इकॉनॉमिने गोलंदाजी करताना ६ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणाऱ्या आर अश्विनने आशिया चषक स्पर्धेत गोलंदाजी करताना ६ सामन्यांमध्ये ६ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने ८ सामन्यांमध्ये ११ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने ६ सामन्यांमध्ये १३ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…