-
सचिन तेंडुलकर
जगामध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या सचिनची एकूण संपत्ती १७० दशलक्ष एवढी आहे. भारतीय रुपयांमध्ये तब्बल १४००+ कोटी. (Photo: Social Media) -
सचिन २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्त्त झाला. दरम्यान, निवृत्तीनंतरही सचिन त्याच्या ब्रँड एंडोर्समेंट व व्यवसायामधून कमाई करतो आहे. तो आयपीएलमधील मुंबई संघाचा मार्गदर्शकही आहे. त्याने क्रीडा अकादमी, रेस्टॉरंट्स आणि विविध स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे सचिनची संपत्ती वाढत राहते. (File Photo)
-
विराट कोहली
भारताचा स्टार प्लेयर विराट कोहली आजघडीला जगामधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. त्यांची एकूण संपत्ती. १२७ दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रूपयांमध्ये १०५०+ कोटी. विराट सध्या जागतिक क्रिकेटमधला सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. जगभरात विराटचे प्रचंड चाहते आहेत. कोहलीही विविध माध्यमांतून कमाई करतो. तो क्रिकेट करार, जाहिराती, व्यवसायांच्या माध्यमातून पैसे कमावतो. (Photo: Social Media) -
त्याचे रॉग्न, वन८ सारखे फॅशन आणि फिटनेस बँड आहेत. विराटनं बड्या लक्झरी प्रॉपर्टीजमध्ये त्याचा पैसा गुंतवला आहे. मुंबईत त्याचे ३४ कोटी रुपयांचे घर आहे. गुडगावमध्ये सुमारे ८० कोटींचा बंगला आहे. कोहलीनं अलीकडेच कसोटी व टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो भारतासाठी आता फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. (Photo: Indian Express)
-
एम. एस. धोनी
जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या स्थानी आहे. महान यष्टीरक्षक अशी ख्याती असलेल्या फलंदाजाची एकूण संपत्ती १२३ दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये १००० + कोटी.
(Photo: Indian Express) -
क्रिकेटशिवाय धोनी शेती, फिटनेस चैन, उत्पादन कंपन्या आणि टेक स्टार्टअप्ससह अनेक व्यवसायांमधून कमाई करतो. अनेक प्रतिष्ठित ब्रँडचा चेहरा असलेल्या धोनीचा चेन्नई सुपर किंग्जमध्ये हिस्सा आहे. धोनीनं २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय, पण माही आयपीएल खेळतो. (Photo: Social Media)
-
रिकी पान्टिंग
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर दिग्गज खेळाडू रिकी पॉन्टिंग चौथ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रिकीकडे एकूण संपत्ती ५८० कोटी रुपये आहे. (Photo: Social Media) -
निवृत्तीनंतर तो कोचिंग व समालोचनात आला. अनेकदा तो जागतिक प्रसारण प्लॅटफॉर्मवर झळकतो. पॉन्टिंग आयपीएलमध्ये पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. (File Photo)
-
ब्रायन लारा
वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती ६० दशलक्ष म्हणजेच ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. निवृत्त झाल्यानंतर लाराने समालोचक व प्रशिक्षक म्हणून काम केलं. त्याने अनेक ब्रँड एंडोर्समेंटही केले, या कारणांनी त्याची आर्थिक स्थिती कायम मजबूत राहिली. लारा आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचा प्रशिक्षक राहिला आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- ८ वर्षांचं प्रेम, ५ मुलांचे आईवडील; ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य