-
रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आपल्या फिटनेसवर काम करत १० किलो वजन घटवलं आहे. रोहित शर्माचे ट्रान्सफॉर्मेशननंतरचे फोटो, व्हीडिओ व्हायरल झाले होते.(फोटो-Rohit Sharma Instagram)
-
रोहित या ट्रॉन्सफॉर्मेशननंतर सीएट अवॉर्ड्ससाठी उपस्थित राहिला होता. यादरम्यान त्याने केलेल्या किलर लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.(फोटो-Rohit Sharma Instagram)
-
रोहित शर्माने १० किलो वजन घटवण्यासाठी कोणता डाएट फॉलो केला होता, याचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. रोहितने आपले आवडते पदार्थ टाळत काटेकोर डाएट पाळलं आणि त्यामुळेच तो वजन कमी करण्यात यशस्वी ठरला.(फोटो-Rohit Sharma Instagram)
-
रोहित शर्माचा डाएट प्लॅन पुढीलप्रमाणे होता; सकाळी ७ वाजता – ६ भिजवलेले बदाम, मोड आलेल्या कडधान्यांचं सॅलड, फ्रेश ज्युस (फोटो-एक्स व्हायरल फोटो)
-
सकाळी ९.३० वाजता – (नाश्ता) – ओट्स + फळं, दुधाचा ग्लास (फोटो-Dhawan Kulkarni Instagram)
-
सकाळी ११:३० वाजता – दही, चिला (बेसन/डाळीचे), नारळपाणी (फोटो-Abhishek Nayar Instagram)
-
दुपारी १:३० वाजता (जेवण) – भाजी, डाळ, भात, सॅलड(फोटो-एक्स व्हायरल फोटो)
-
संध्याकाळी ४:३० वाजता – फळांची स्मूदी, सुका मेवा(फोटो-Rohit Sharma Instagram)
-
रात्री ७:३० वाजता (रात्रीचं जेवण) – पनीर आणि भाज्या, पुलाव, भाज्यांचं सूप(फोटो-Rohit Sharma Instagram)
-
९:३० रात्री – ग्लासभर दूध, मिक्स सुका मेवा(फोटो-Rohit Sharma Instagram)

Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?