-
कमालीचं टॅलेंट असलेला एक कमालीचा युवा क्रिकेटपटू अशी आपली ओळख निर्माण केलेला पृथ्वी शॉ मात्र वादांमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. रणजी स्पर्धेपूर्वीच्या सराव सत्रात त्याने माजी मुंबईच्या संघातील खेळाडू मुशीर खानबरोबर मैदानावर जोरदार वाद घातला होता. ज्यामुळे पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला. याचदरम्यान त्याच्या कारकिर्दीत नेमकं काय काय घडलं, याचा आढावा घेऊया.
-
पृथ्वी शॉने लहानपणी मुंबईतील स्थानिक अकादमी मधून प्रशिक्षण घेत आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर भारताच्या अंडर-१९ संघात दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या आक्रमक शैलीमुळे सर्वांचे लक्ष वेधले. पृथ्वीची फलंदाजी पाहून त्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर अन् ब्रायन लारा अशी उपमा दिली जात होती,
-
पृथ्वी शॉ ला २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या १८व्या वर्षी पदार्पण केलं. त्याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच वेस्ट इंडिजविरूद्ध १५४ चेंडूत १३४ धावा केल्या. पृथ्वी शॉने पदार्पणात ९९ चेंडूत शतक केलं, ज्यामुळे तो कसोटी पदार्पणात शतक करणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला.
-
पृथ्वी शॉ ला २०१९ मध्ये बीसीसीआयने डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याने आठ महिन्यांसाठी निलंबित केलं. पृथ्वी शॉवर प्रतिबंधित औषध घेतल्याचा आरोप झाला.
-
पृथ्वी शॉला २०२० मध्ये न्यूझीलंडविरूद्ध वनडेमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. यामध्ये त्याने १०५ चेंडूत १०४ धावा केल्या. यासह कसोटीनंतर वनडे पदार्पणात शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला.
-
पृथ्वी शॉने सुरूवातीला उत्कृष्ट कामगिरी केली, पण सातत्यपूर्ण कामगिरीतील अभाव २०१९ मधील डोपिंग प्रकरण या कारणांमुळे त्याने संघातील स्थान गमावलं.
-
पृथ्वी शॉ खराब फॉर्मशी झुंजत असताना त्याच्यावर शिस्तभंगाचा आरोप करण्यात आला. यामुळे त्याचं संघातील स्थानही धोक्यात आलं. यादरम्यान रात्री उशिरा केल्या जाणाऱ्या पार्टीमधील अनेक प्रकरण समोर येत होती.
-
दरम्यान २०२३ मध्ये अंधेरीच्या पबमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल हिच्याबरोबर वाद झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. सपनाने त्याच्यावर क्काबुक्की आणि छेडछाड करण्याचे आरोप केले होते.
-
२०२४ मध्ये पृथ्वी शॉला मुंबईच्या देशांतर्गत क्रिकेटमधील संघातूनही वगळण्यात आलं. पृथ्वी शॉ यादरम्यान अत्यंत खराब फॉर्मशी झुंजत होता. फॉर्म व्यतिरिक्त त्याचा फिटनेस ही देखील मोठी समस्या आहे. पृथ्वी शॉच्या शरीरात ३५ टक्के फॅट आहे आणि संघात परत येण्यापूर्वी त्याला कठोर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, अशी माहितीही समोर आली होती.
-
आयपीएल २०२५ च्या महालिलावात पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला. कोणत्याच संघाने त्याची निवड केली नाही. यानंतर पुन्हा एकदा पृथ्वी शॉ चा फॉर्म त्याचा फिटनेस यावर चर्चा सुरू झाली.
-
नव्या रणजी हंगामापूर्वी पृथ्वी शॉ ने मुंबई संघाची साथ सोडून महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने पदार्पण सामन्यात शतक झळकावत पुनरागमनाची झलक दाखवली. पण रणजीच्या पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. (सर्व फोटो सौजन्य:लोकसत्ता संग्रहित)

IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार?