-
पाकिस्तान सुपर लीगच्या मुल्तान सुल्तान्स संघाचे मालक अली खान तारीन यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कायदेशीर नोटीसला दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे.
-
पीसीबीने त्यांच्यावर त्यांच्या १० वर्षांच्या करारातील अनेक कलमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. पीएसएल संघाचे मालकी हक्क डिसेंबरमध्ये संपणार आहेत. सध्याच्या मालकांना त्यांची मालकी टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा बोली प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे.
-
पाकिस्तान सुपर लीगच्या व्यवस्थापनावर टीका केल्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली नाही तर त्यांच्या मालकाला ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी पीसीबीने दिल्याचा आरोप मुल्तान सुल्तान्सने केला आहे.
-
अली खान तारीन गेल्या वर्षभरात पीएसएल व्यवस्थापनावर संवादाच्या समस्या आणि पारदर्शकतेच्या चिंतांबद्दल, जोरदार टीका करत आहेत.
-
जर ब्लॅकलिस्ट केले गेले तर मुल्तान सुल्तान्सचे मालक अली खान तारीन सध्याच्या कराराची मुदत संपल्यानंतर मुल्तान सुल्तान्सच्या पुनर्निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत. या धमकीनंतरही तारीन पीसीबी व्यवस्थापनाच्या निर्णयांना आव्हान देत आहेत.
-
अली खान तारीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी पीसीबी व्यवस्थापन आणि फ्रँचायझींमधील थेट संवादाच्या अभावावर भाष्य केले आहे.
-
ते म्हणाले, “मला कायदेशीर नोटीस बजावण्यापेक्षा तुम्ही अधिक सक्षम असता तर तुम्हाला कळले असते की या बाबी अशा प्रकारे हाताळल्या जात नाहीत.”
-
अली खान तारीन यांनी पुढे सांगितले की, “त्यांच्या लीगल टीमच्या मते माफी मागण्यासाठी कोणतेही योग्य कारण नाही. तरीही पीएसएलच्या फायद्यासाठी माफी मागण्याचा विचार करेन.”
-
या व्हिडिओच्या शेवटी त्यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पाठवलेली कायदेशीर नोटीस फाडून टाकली आणि म्हटले, “मला आशा आहे की तुम्हाला माझा माफी मागणारा व्हिडिओ आवडेल.” (All Photo: @aslitareen/Instagram)
बी. आर. गवई यांच्या निवृत्तीनंतर भारताचे सरन्यायधीश होणारे न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत?