-    भारताच्या महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. भारतीय संघाने ही ऐतिहासिक कामगिरी अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. त्यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये बीसीसीआयने भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. (Photo: PTI) 
-    देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू अमोल अनिल मुझुमदार हे मुंबई आणि नंतर आसामसाठी फलंदाज म्हणून खेळले आहेत. त्यांनी भारताच्या देशांतर्गत क्रिकेट इतिहासात मोठी छाप सोडली आहे. दोन दशकांहून अधिक काळ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, त्यांनी ११,००० हून अधिक धावा केल्या आहेत.(Photo: PTI) 
-    मुझुमदार यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण बीपीएम हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतला. येथेच त्यांची भेट महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी झाली. (Photo: PTI) 
-    अमोल मुझुमदार यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना भारताचा ‘पुढचा तेंडुलकर’ असे संबोधले जात असे. ते १९९४ च्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे उपकर्णधार होते. ते राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासोबत इंडिया अ संघाकडूनही खेळले आहे. असे असले तरी त्यांना भारतीय संघातून खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. (Photo: PTI) 
-    देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, मुझुमदार यांनी प्रशिक्षक म्हणून कारकिर्द सुरू केली. त्यांनी भारताच्या १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील संघांसाठी फलंदाजी प्रशिक्षक, नेदरलँड्स क्रिकेट संघाचे सल्लागार आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. (Photo: PTI) 
-    मुझुमदार यांनी भारत दौऱ्यादरम्यान दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघालाही काही काळ प्रशिक्षणही दिले आहे. त्यांनी मुंबई रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर २०२३ मध्ये भारताच्या महिला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक त्यांना संधी मिळली. (Photo: Amol Muzumdar/Facebook) 
-    अमोल मुझुमदार यांचा विक्रमी फलंदाज ते प्रशिक्षक हा प्रवास भारतीय क्रिकेटप्रती असलेल्या त्यांचे समर्पण अधोरेखित करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ केवळ ऐतिहासिक विजय मिळवत नाही तर क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्य घडवत आहे. (Photo: PTI) 
 
  INDW vs AUSW: भारत वर्ल्डकप जिंकला तर मी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर.., सुनील गावसकरांनी दिलं वचन 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  