-
विवोचा बहुप्रतिक्षित स्वस्त स्मार्टफोन ‘विवो Y02’ लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला असून, पुढच्या आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. काय आहेत या फोनचे आकर्षक फीचर्स जाणून घ्या.
-
हा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे. याची किंमत फक्त ८ हजार रुपये आहे.
-
या फोनमध्ये ३ जीबी+३२ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. ऑर्किड ब्लू आणि कॉस्मिक ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये फोन उपलब्ध आहे.
-
फोनमध्ये ६.५ इंच IPS LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. फोनच्या पुढच्या बाजुला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. ७२०×१६०० पिक्सेलचे एचडी प्लस रिझोल्यूशन आणि P22 चिप प्रोसेसर देखील या फोनमध्ये उपलब्ध असेल.
-
‘विवो Y02’मध्ये ८ मेगापिक्सेल सेन्सरचा सिंगल रेअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
-
या फोनमध्ये ड्युअल बँड वाय फाय, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, ब्लुतुथ ५.० आणि जीपीएस सुविधा उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ‘१२ गो एडिशन’वर आधारित आहे. या फोनची किंमत भारतात ८,४९९ रुपये असणार आहे. (फोटो सौजन्य: vivo.com)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली