-
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने संसद आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला भेट दिली.
-
सचिन तेंडूकलर विद्यार्थ्यांशी बोलला आणि क्रिकेटच्या मैदानावर उतरताच गोंधळाला सुरुवात झाली. मैदानात उतरलेल्या सचिनसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक कर्मचारी आणि अधिकारीच उतावीळ झाले होते. मैदानात उतरलेल्या सचिनची सकाळपासून वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे दर्शन झाले नाही.
-
स्थानिक बालवाडीच्या शाळेत छोट्या चहात्यांबरोबर मास्टर ब्लास्टर चांगलाच रमल्याचे चित्र दिसले.
-
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सचिनचा सत्कार झाला
-
महाराष्ट्रातील १५ गावांत जाऊन आपल्या पथकातील सदस्यांनी पाहणी केली. वेगवेगळ्या धर्माचे लोक मोठय़ा संख्येने आनंदाने एकत्रित राहत आहेत, ही बाब आपल्याला खूप भावली. या धार्मिक एकोप्यामुळेच आपण डोंजा गावाची आदर्श संसद ग्राम योजनेत निवड केली असल्याचे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले.
-
सचिनला भेटण्यासाठी आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली.
-
सचिनच्या हस्ते काही योजना फलकांचे अनावरण करण्यात आले
-
सचिनच्या हस्ते काही योजना फलकांचे अनावरण करण्यात आले
-
स्थानिक प्रशासनाकडून नियोजनात थोडा गोंधळ झाला तरीही सचिनने दत्तक घेतलेल्या गावाचा दौरा एन्जॉय केल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”