-
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या संचलनात भारतीय संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळालं. कलात्मक आणि तितक्याच लक्षवेधी चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या साऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने अनेकांची मनं जिंकली. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग साकारण्यात आलेल्या या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रा. नरेंद्र विचारे यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारणाऱ्या कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचाही यावेळी केंद्रीय रक्षामंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
ट्विटरवर यासंबंधीचे फोटो पोस्ट करण्यात आले असून, यावेळी चित्ररथावर असणाऱ्या कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. केंद्रातील मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या कलाकारांचा होणारा गौरव पाहता 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' या ओळी पुन्हा एकदा सर्वांच्याच मनात घर करुन गेल्या असणार यात वाद नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्ररथ साकारणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रथम पारितोषिकाचे मानचिन्हं आणि प्रमाणपत्रही सर्वांनाच पाहायला मिळाले. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
(छाया सौजन्य- ट्विटर)
-
चित्ररथ साकारणाऱ्या कलाकारांची टीम. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
राजपथावर मोठ्या दिमाखात आलेल्या महाराष्ट्राच्या या चित्ररथाच्या पुढच्या बाजूस किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दाखवण्यात आली होती. चित्ररथाच्या मध्यभागी रायगड आणि त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनारुढ छत्रपती शिवराय दाखवण्यात आले होते. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजनही दाखवण्यात आले होते. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या. (छाया सौजन्य- ट्विटर)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा