-
लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा आज, सोमवारपासून सुरू झाली आहे.
-
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून भुवनेश्वरसाठी सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी विमानाने उड्डान घेतलं.
-
विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग झालं.
सर्व प्रवाशांना एअरलाइनकडून कव्हर मास्क (Face Shield ) देण्यात आले. -
फ्लाइट अटेडेंट आणि हवाई सुंदरी पीपीई किट घालून दिसून आले. -
एएनआयच्या वृत्तानुसार, विस्तारा एअरलाइनची फ्लाइट दिल्लीहून भुवनश्वरला सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी रवाना झाली.
-
दिल्लीहून सकाळी चार वाजून ४५ मिनिटांनी पुण्यासाठी फ्लाइट रवाना होणार होती मात्र त्या फ्लाइटचे कोणतेही स्टेटस मिळाले नाही.
-
सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी अहमदाबादहून फ्लाइट रवाना झाली
-
दोन महिन्यानंतर हवाई यात्रा सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये उत्साह दिसून आला त्याशिवाय करोना व्हायरसबाबत जागृकताही दिसून आली.
-
राजधानी दिल्लीच्या विमानतळावर रात्री दोन वाजताच प्रवाशांनी यायला सुरूवात केली होती.
नियमानुसार सर्व प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग झाल्यानंतरच आत सोडण्यात आले. -
विमानसेवा सुरू झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर रौनक दिसून आली.
-
खाण्याचे शॉप आणि कपड्यांचे शोरूमही उघडलेले होते.
हवाई सुंदरीही आपल्या ड्युटीवर जाताना दिसून आल्या.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”