-
सुमारे ३ ते ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाउनमध्ये काढल्यानंतर राज्यात नागरिकांमध्ये आता करोनाची भीती राहिलेली नसल्याचं चित्र समोर येत आहे.
-
लॉकडाउन काळात ठप्प पडलेलं अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी सरकारी यंत्रणांनी हळुहळु सर्व गोष्टींना परवानगी द्यायला सुरुवात केली. नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अशा सर्व गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
-
परंतू दिवाळीच्या पार्श्वभुमीवर पुण्यातील सुप्रसिद्ध तुळशी बागेत खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता, आता नागरिकांमध्ये करोनाचं भय राहिलंच नसल्याचं दिसून येत होतं. (सर्व छायाचित्र सौजन्य – पवन खेंगरे आणि आशिष काळे)
-
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर कपडे, छोट्या-मोठ्या सजावटीच्या वस्तू व इतर सामानाची खरेदी करण्यासाठी पुण्यातील महिला वर्गाची पावलं तुळशीबागेकडे वळतात.
-
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना सर्व नियमांचा विसर पडलेला दिसत होता.
-
सोशल डिस्टन्सिंग तर दूरवर कुठेही दृष्टीपथास पडत नव्हतं…आजही पुण्यात प्रत्येक दिवशी करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
-
अशा परिस्थितीत नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर राज्यात पुन्हा थंडीच्या दिवसांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे.
-
पुण्यात गेल्या २४ तासांत १६९ नवे करोना बाधित रुग्ण सापडले आहेत, तर दिवसभरात १० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
-
लॉकडाउन पश्चात गाडी रुळावर येत असताना नागरिकांनीही नियम पाळून सरकारी यंत्रणांना मदत करणं गरजेचं आहे.
-
परंतू असे प्रकार घडत राहिल्यास राज्यासह देशात करोनाची दुसरी लाट येऊन अधिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-
जी परिस्थिती तुळशी बागेत दिसली तिच परिस्थिती पुण्याच्या शिवाजी रोड परिसरात दिसली.
-
दिवाळीची खरेदी करण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक