-
काश्मीरच्या पठारी आणि पर्वतीय भागांमध्ये मंगळवारी सर्वसाधारण ते मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली. (सर्व छायाचित्रे – शोएब मसुदी)
-
जोरदार हिमवृष्टी आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी बंद होता.
-
हिमवृष्टी होत असल्याने डोक्यावर छत्री घेऊन निघालेली एक काश्मिरी महिला आपल्या मुलासोबत जात असताना श्रीनगरमध्ये टिपलेले छायाचित्र.
-
श्रीनगरमध्ये सुरु असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टांगा चालकाला टांगा चालवणं कठीण जात होतं.
-
कारच्या काचेवर साचलेला बर्फाचा थर काढून ती स्वच्छ करताना एक कारचालक.
-
दृष्यमानता कमी झाल्याने श्रीनगरहून होणारी विमानोड्डाणं मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली होती.
-
जम्मू-श्रीनगर हायवेवर साचलेला बर्फ काहीचा हटवण्यात आल्यानंतर थोड्या प्रमाणावर इथली वाहतूक सुरु झाली.
-
श्रीनगरमध्ये मंगळवारी उणे ८ डिग्री तापमानाची नोंद झाली. सोमवारपेक्षा (उणे ९) हे तापमान किंचित जास्त होते.
-
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी सर्वाधिक हिमवृष्टी झाली. यामुळे रस्त्यांवर तीन ते चार फूट बर्फ साचला होता.
-
मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असल्याने श्रीनगरमधील व्यापाऱ्यांनी ऊब मिळावी यासाठी शेकोटी पेटवल्या होत्या.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक