-
अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी येणाऱ्या नवख्या तरुणाींना जाळ्यात ओढून त्यांना पॉर्न व्हिडीओत काम करायला लावणाऱ्या एका रॅकेटचा अलिकडेच मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केलेलं आहे. या घटनेची चर्चा सुरू असताना मुंबईत अशीच एक धक्कादायक आणि जागं करणारी घटना समोर आली आहे. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
ठाणे जिल्ह्यातून दहावीत पहिला आलेला आणि आता शिक्षक असलेल्या तरुणाने आपल्या दोन मित्रांसह Porn Prank Video सपाटाच लावला होता. तरुणींच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्या यू ट्यूब वाहिन्या, फेसबूकसह अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित करायचे. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
टाळेबंदीच्या काळात या तीन तरुणांनी कोट्यवधी रुपये कमावले. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. यापैकी एक तरुण २००८ मध्ये ठाणे जिल्ह्यातून दहावीत पहिला आला होता. सध्या तो शिक्षक आहे. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
टाळेबंदीच्या कालावधीत या तीन तरुणांनी १७ यू ट्यूब वाहिन्या तयार केल्या. त्यावर सुमारे ३०० अश्लील ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या. त्या सुमारे १५ कोटी व्यक्तींनी पाहिल्या. अधिकाधिक दर्शकसंख्या लाभलेल्या वाहिन्यांना यू ट्यूब, फेसबूक मानधन देते. या आरोपींनी हे मानधन तर घेतलेच, शिवाय या चित्रफितींआधारे दर्शकसंख्या वाढवून जाहिरातीही गोळा केल्या. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
टाळेबंदीत या तिघांनी सुमारे दोन कोटी रुपये या माध्यमातून कमावले, अशी माहिती सायबर विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. आरोपींनी प्रसारित केलेल्या ३०० ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवरून हटविण्यात आल्या आहेत. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
या तीन आरोपींप्रमाणे अश्लील ध्वनिचित्रफिती प्रसारित करणाऱ्या, त्या आधारे अर्थार्जन करणाऱ्या अनेक व्यक्ती, टोळ्या असून त्यांची माहिती मिळवली जात आहे, अशी माहिती करंदीकर यांनी दिली. अशा अश्लील व्हिडीओतून महिला, तरुणींची पिळवणूक सुरू असल्याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. आयोगाने त्या तपासासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे पाठविल्या होत्या. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
या प्रकरणातील प्रमुख आरोपी खासगी शिकवणीत शिकवतो. त्याने स्वत:च्याच विद्यार्थिनींच्या अश्लील ध्वनिचित्रफिती बळजबरी तयार करून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
आरोपी खट्याळ, गमतीदार चित्रफिती चित्रित करण्याच्या बहाण्याने, आर्थिक लाभाचे प्रलोभन दाखवायचा. तरुणींचं व्हिडीओसाठी मन वळवल्यानंतर त्यांना तरुणींना निर्जन ठिकाणी नेत असे. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)
-
निर्जनस्थळी घेऊन गेल्यानंतर आरोपी तरुणींना अश्लील प्रकार करण्यास भाग पाडे. तरुणींनी विरोध केल्यास चित्रीकरणाचा खर्च भरावा लागेल, अशी धमकीही देत असे. या प्रकाराला काही महिलाही बळी पडल्या असल्याचं आता समोर आलं आहे. (प्रातिनिधीक PTI)
-
बदनामी होईल, लग्न मोडेल, आयुष्य उद्ध्वस्त होईल… अशा विनंत्यांनाही आरोपीने थारा दिला नाही. यापैकी एका तरुणीने चित्रफीत न हटविल्यास आत्महत्या करण्याची धमकी आरोपीला दिली होती. आरोपीने त्या तरुणीची चित्रफीत एका यू-ट्यूब वाहिनीवरून हटवली. मात्र दुसऱ्या वाहिनीवर प्रसारित केली. (सर्व छायाचित्रं संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेण्यात आलेली आहेत/लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान