-
रात्रीच्या शांततेत किंकाळत जाणाऱ्या रुग्णवाहिका… एका इंजेक्शनसाठी मेडिकलचे उंबरठे झिझवणारे नातेवाईक… आणि मृत्यूच्या दाढेतून परतण्यासाठी जिवाच्या आकांताने विषाणूशी झूंज देणारे रुग्ण… हे सध्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात घडतंय… (एका रुग्णालयाबाहेर छायाचित्र>इंडियन एक्स्प्रेस)
-
प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरात रुग्णाला घेऊन बेडच्या शोधात रुग्णावाहिका जीव तोडून धावाताहेत. पण, इतकं करूनही प्राण वाचतील यांची शाश्वती नाहीच. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात मध्य प्रदेश सगळीकडची दृश्य सारखीच. रुग्णवाहिकांच्या रांगा आणि त्यात जीवन मृत्यूच्या रेषेवर उभे असलेले अन् श्वास घ्यायला धडपडणारे जीव. (राजकोटमधील एका शासकीय रुग्णालयाबाहेरील दृश्य> एएनआय)
-
ही दृश्य आहेत गुजरातमधील राजकोट शहरातील. असं म्हणतात एक छायाचित्र हजार शब्दातील भावना व्यक्त करत. पण ही दृश्य हादरवून टाकणाऱ्या स्फोटक परिस्थितीचा आरसा बनली आहेत. (राजकोटमधील एका शासकीय रुग्णालयाबाहेरील दृश्य> एएनआय)
-
राजकोटमधील एका शासकीय रुग्णालयांबाहेर रुग्णवाहिकांच्या अशा रांगा लागलेल्या आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये आहेत उपचाराच्या प्रतिक्षेत असलेले रुग्ण आणि रुग्णवाहिकांभोवती मृत्यूच्या भीतीने हादरून केलेले कुटुंबीय. एका विषाणून देशातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे काढली आहेत. (राजकोटमधील एका शासकीय रुग्णालयाबाहेरील दृश्य> एएनआय)
-
फक्त एक बेड आणि औषधोपचारासाठी रुग्णांना वेदना सोसाव्या लागत आहे. पण, रुग्णालयात जाण्याच्या त्यांच्या वाटाच जणू काय व्यवस्थारुपी मृत्यूने अडवल्या आहेत. (एका रुग्णालयाबाहेर छायाचित्र>इंडियन एक्स्प्रेस)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली