-
पुण्यातील कसबा गणपती ते लाल महालपर्यंत गुरुवारी विजयी मिरवणूक काढण्यात आली.
-
१० फेब्रुवारी याच दिवशी २५१ वर्षांपूर्वी मराठा साम्राज्याने राजधानी दिल्ली काबीज केली होती.
-
याच ऐतिहासिक घटनेच्या २५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी पुण्यामध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली होती.
-
पारंपारिक वेष करून या मिरवणुकीत नागरिकांनी सहभाग नोंदवला.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत माधवराव पेशव्यांची वेशभूषा करून छोटी मुलं देखील या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती.
-
(सर्व फोटो : अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत