-
भारतात गेल्या काही दिवसात झालेली इंधन दरवाढ पाहता इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली. त्यात हिरो इलेक्ट्रिक, ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा ऑटोटेक, एम्पर व्हेइकल्स आणि एथर एनर्जीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे.
-
हिरो इलेक्ट्रिक- हिरो इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी गेल्या काही दिवसात वाढल्याचं चित्र आहे. मार्च २०२२ मध्ये १० हजारांहून अधिक स्कूटरची विक्री झाली आहे. त्याचबरोबर याच महिन्यात १३,०२२ स्कूटरची नोंदणी करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात स्कूटरची नोंदणी ७,३५६ इतकी होती. गेल्या तीन महिन्यात ३० हजाराहून अधिक युनिटची विक्री करण्यात आली आहे.
-
ओला इलेक्ट्रिक- ओला इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी जोरदार आहे. गेल्या महिन्यात एका स्कूटरला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. मात्र असं असलं तरी स्कूटरच्या विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही. ओलाच्या ९,१२३ स्कूटरची विक्री झाली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत विक्री दुप्पटीने वाढली आहे.
-
ओकिनावा ऑटोटेक- ओकिना इलेक्ट्रिक स्कूटर हिरो आणि ओलाच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने नुकतीच हायस्पीड Okhi-90 ही गाडी लाँच केली आहे. मार्च महिन्यात एकूण ८,२८४ युनिटची विक्री झाली आहे. तर या वर्षाच्या शेवटापर्यंत ५० हजार युनिटची विक्री होईल असा कंपनीला विश्वास आहे.
-
एम्पर व्हेइकल्स- एम्पर व्हेइकल्सच्या रिओ, रिओ इलाई, मॅगनस ईएक्स, मॅगनस प्रो आणि झील या गाड्या बाजारात आहेत. गेल्या महिन्यात ६,३३८ गाड्यांची विक्री झाली. फेब्रुवारी महिन्यात ४,३०३ युनिटची विक्री झाली होती.
-
एथर एनर्जी- कंपनीच्या २,५९१ युनिट्सची विक्री मार्च महिन्यात झाली. फेब्रुवारी महिन्यात २,२२९ युनिट्सची विक्री झाली होती.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल