-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज(२ ऑगस्ट) महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले.
-
दर्शन घेतल्यानंतर ‘श्री खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट’ मंदिराचा कलशपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.
-
“राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे. तसेच राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे”, असे साकडे त्यांनी खंडेरायाच्या चरणी घातले.
-
यावेळी “जेजुरी देवस्थान परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
-
जेजुरी गडाचे जतन व संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.
-
मंदिर समितीने पारंपरिक घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री शिंदेंना सन्मानित केले.
-
यावेळी भंडाऱ्याची उधळण करीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोषही मुख्यमंत्र्यांनी केला.
-
(सर्व फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”