-
International Day of Yoga 2023 : जागतिक योग दिनानिमित्त आज मुंबईत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय आणि विधानभवनात योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या तिन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजर लावत योगाची प्रात्यक्षिके केली. सतत पांढऱ्या सुटाबुटात असणारे एकनाथ शिंदे आज चक्क योगा सूटमध्ये दिसले.
-
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागंण येथे आज आतंरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. (सर्व फोटो – एकनाथ शिंदे ट्विटर)
-
यावेळी उपस्थितांसोबत एकनाथ शिंदे यांनीही योगासने केली.
-
“शरीर, मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताण तणाव वाढले आहे. या ताण तणावावर योग हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. योग साधनेमुळे असाध्य आजारही बरे होतात. आज राज्यात सर्वदूर योग दिनाचे अनेक कार्यक्रम होत आहेत हे निश्चितच आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे”, असं मत यावेळी व्यक्त केले.
-
-
-
-
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त विधानभवन परिसरात विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने ‘योग प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल रमेश बैस यांच्यासह या कार्यक्रमात सहभागी होऊन एकनाथ शिंदे यांनी योगाभ्यास केला.
-
यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनीही प्रात्यक्षिके केली.
-
-
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातही एकनाथ शिंदे यांनी योग प्रात्यक्षिके केली. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.
-
धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज असून ही लोकचळवळ झाली पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
-
-
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायला सुरुवात केली. आपल्या देशाने योग ही आरोग्याची गुरुकिल्ली संपूर्ण जगाला दिली आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये असंख्य मंडळींनी एकाच वेळेस योग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्वांना केले.
-
-

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल