-
राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे.
-
गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांच्या सत्तास्थापनेला एक वर्षे पूर्ण होताच आता राष्ट्रवादीतही फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ३० आमदार राजभवनावर दाखल झाले आहेत.
-
२०१९ पासून राज्यात आज चौथा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
दरम्यान, राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी झाल्याचे फोटो समोर येत आहेत.
-
राज्यात आज केव्हाही पुन्हा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
राज्यात एवढी मोठी घडामोड घडत असताना कोणालाही कानोकान खबर लागली नव्हती. परंतु, आज रविवारच्या दिवशी अचानक राजकीय भूकंप झाला आहे.
-
दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, अमोल कोल्हे, सुनिल तटकरे, सरोज अहिरे आदी आमदार राजभवनात हजर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
-
दरम्यान, आजच्या शपथविधीला शरद पवारांची परवानगी नसल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. आज राष्ट्रवादीचे नऊ मंत्री शपथ घेणार असल्याचंही सांगण्यात येतंय.
-
आज जर शपथविधी झाला तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री असणार आहेत.

Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये होणार फाशी, जाणून घ्या नेमकं हे सगळं प्रकरण काय?