-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दक्षिणेकडील बोगद्याचे उद्घाटन करण्याआधी कोस्टल रोडची पाहणी केली.
-
मुंबईकरांसाठी आजपासून कोस्टल रोड खुला करण्यात आला आहे.
-
त्याआधी बोगद्यातील पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तिथे पोहचले होते.
-
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते.
-
कोस्टल रोड प्रकल्पात दोन महाकाय बोगदे आहेत, हे बनवण्यासाठी मावळा टनेल बेअरिंगचा वापर करण्यात आला आहे.
-
१०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड प्रियदर्शनी ते वरळी सी लिंक असा बनवण्यात आला आहे.
-
या रोडमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. नरीमन पॉईंट ते हाजीअली आता कोस्टलमुळे फक्त ९ मिनिटात सर होणार आहे.
-
कोस्टलमुळे जवळपास ७० टक्के वेळ वाचणारं असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
-
वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे ३४ टक्के इंधनबचत करणारा कोस्टल रोड आता नागरिकांच्या सेवेत खुला झाला आहे.
-
सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार हा कोस्टल रोड खुला राहणार आहे.
-
दरम्यान या पाहणीनंतर लगेच दक्षिणेकडील बोगद्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतचा बोगदा आज खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोस्टल रोडच्या उद्घाटना दरम्यान एकमेकांशी चर्चा करताना.
-
(सर्व फोटो साभार- Express Photo By Ganesh shirsekar) हेही पहा – PM Modi Cabinet 3.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात ३० केंद्रीय तर ४१ राज्…

“पाच-पाच जण मारत होते”, आव्हाडांनी सांगितलं नेमकं काय घडलं; म्हणाले, “पोलीस मारेकऱ्यांना तंबाखू…”