-
राहुल गांधी यांनी अलीकडेच काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत.
-
या छायाचित्रांमध्ये राहुल गांधी काही मुलांसह दिसत आहेत.
-
दरम्यान आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. त्यानिमिताने हे फोटो राहुल गांधी यांनी शेअर केले आहेत.
-
हे फोटो जुने असून, “भारत जोडो न्याय” यात्रा सुरु असताना काढलेले आहेत.
-
यामध्ये राहुल गांधी जपानी मार्शल आर्ट जिउ-जित्सूचा सराव करताना दिसत आहेत.
-
यात्रा सुरु असताना राहुल गांधी या सर्व मुलांसोबत या मार्शल आर्टचा सराव करत असत त्यांनी या पोस्टला दिलेल्या Caption मध्ये सांगितलं आहे.
-
राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय?
“भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दररोज संध्याकाळी शिबिराच्या ठिकाणी जिउ-जित्सूचा सराव करण्याचा आमचा नित्यक्रम होता” -
“तब्येत ठणठणीत ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग होता. हळू हळू आमच्यासोबत अनेकजण या सरावासाठी सहभागी होत गेले. मुक्कामाच्या ठिकाणी असलेले तेथील रहिवासी तसेच या मार्शल आर्टच्या विद्यार्थ्यांना सहयात्री या सर्वांना एकत्र आणले आणि आम्ही सर्वांनी जोरदार सराव केला.”
-
या आर्टचा तुम्हालाही फायदा व्हावा, तसेच जिउ-जित्सू, अकीडो असे मार्शल आर्ट मन एकाग्र करणारे, चित्ताला शांत करणारे क्रीडा प्रकार तुम्हालाही जीवनात अवलंबता यावे, यासाठी हे शेअर करत आहे.”
-
या पोस्टचा शेवट करताना राहुल गांधींनी “भारत डोजो यात्रा’ लवकरच येत आहे.” असे म्हटले आहे. (Photos Source : Rahul Gandhi/Facebook) (डोजोचा अर्थ ट्रेनिंग हॉल किंवा मार्शल आर्ट स्कूल असा होतो.)

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद दोन मिनिटांत गुंडाळली, पोलीस म्हणाले…